राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का?; राजेश टोपे म्हणतात की..!

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनचा कालावधी येत्या काही दिवसात संपुष्ठात येणार आहे. मात्र अद्यापही मुंबईत पूर्णपणे कोरोना संसर्ग कमी झालेला नाही आहे. याच पार्श्वभुमीवर पुन्हा लॉकडाउनच कालावधी वाढवला जाणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचक विधान केले आहे.

सध्या राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यतील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी ५० हजारांच्यावरच राहिलेली आहे. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यात रोज ५० हजारांच्यावरच रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हवा तसा कमी झालेला नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. पण परिस्थिती निवळलेली नाही. त्यामुळे निर्बंध काढून घेण्यात आले तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत १५ मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: