नातेवाईकांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी अन् शिवसैनिकांच्या वाट्याला काहीच नाही

 

राज्यात ईडीने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर कारवाई केलेली असताना त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीने छापा टाकून ११ सदनिका सील केल्या आहेत यावर आता संपूर्ण राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा भाष्य करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

राणे म्हणाले की, आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच! आगे आगे देखिए होता है क्‍या! असा इशारा नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

तसेच महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या असा आरोपही नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Team Global News Marathi: