कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

 

मुंबई | महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटवरून सध्या नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी थेट महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून या किटचं वाटप करण्यात येते. आरोग्य विभागाकडून हा उपक्रमक राबवला जात आहे .

मात्र कुटुंब नियोजनासाठी देण्यात आलेल्या किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारावर आशा सेविका नाराज झाल्या असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघही चांगल्याच भडकल्या असून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.

 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा. आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं. वर हे अजून..थोडी लाज ठेवा. मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही टॅग केले आहे.

Team Global News Marathi: