अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, विश्वासू सहकाऱ्याला ईडीने बजावली नोटीस

 

 

 

राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीच्या अनेक आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशा लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सुद्धा काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढल्या होत्या. आता त्या पाठोपाठ अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना ईडीनं नोटीस बजावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँडरिंग प्रकरणी ही नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू मानले जातात. खरमाटे हे आरटीओ अधिकारी आहेत. त्यांना आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

तसेच ईडीकडून खरमाटे यांना बजावलेलं हे पहिलं समन्स आहे. गेल्या आठवड्यात अनिल परब यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीनं बजावली होती. आता खरमाटे यांना आलेल्या नोटीशीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे. गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर ईडीनं छापेमारी केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. या छापेमारी दरम्यान ईडीनं काही कागदपत्रंही ताब्यात घेतली आहेत.

Team Global News Marathi: