ठाण्यात घरात घुसून भाजपा नगरसेवकाने केला महिलेचा विनयभंग

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेली आहे. अटक महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. तेलवणे यांच्यावर एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती गुरुवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

काल रात्री जवळपास १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी घरात घुसून नगरसेवक असलेल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. याप्रकरणी तेलवणे यांच्यावर विविध कलमा अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

एकीकडे राज्यात धनंजय मुंडे आणि काँग्रेस प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे यांच्यावर आरोप लावण्यात आले होते. तर संजय राठोड यांना महिला प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. आता घरात घुसून नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.

Team Global News Marathi: