संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झल्यापासून आघाडीतील नेत्यांच्या मागे गेल्या काही दिवसांपासून ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला आहे.आणि या कारवायांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता भाजपवर टीका केलीय. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

आता संजय राऊतांच्या या वक्तव्याचा आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय, अस उत्तर चित्रा वाघ यांनी दिल आहे. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’, असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

 

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांवर, मंत्र्यांवर भाजपचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना नुसत्या खुर्च्या उबवू नका, तर भाजपला सडेतोड उत्तर द्या, असं आवाहन केलं आहे. तसंच, किरीट सोमय्या यांना काश्मीरमध्ये पाठवा, असं देखील राऊत म्हणाले.संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही टीका केली होती.

Team Global News Marathi: