पुणे विभागात आजवर पावणेपाच लाख कोरोना बाधित झाले बरे: ऍक्टिव्ह रुग्ण संख्या केवळ 19 हजार

सोलापूर : पुणे विभागातील 4 लाख 72 हजार 512 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 5 हजार 878 झाली आहे. तर ऍक्‍टीव रुग्ण संख्या 19 हजार 213 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 153 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 24 हजार 666 रुग्णांपैकी 3 लाख 5 हजार 265 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण 11 हजार 566 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 835 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.02 टक्के आहे. सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 775 रुग्णांपैकी 42 हजार 134 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.ऍक्‍टीवरुग्ण संख्या 3 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 894 रुग्णांपैकी 37 हजार 303 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 2 हजार 127 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 320 रुग्णांपैकी 42 हजार 152 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीवरुग्ण संख्या 1 हजार 520 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 223 रुग्णांपैकी 45 हजार 658 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 922 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: