कोल्हापुरात साडेसहा लाखाच्या नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बाइक जळून खाक

 

कोल्हापुर | जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकींना अचानक आग लागून त्या जळून खाक झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आठही बाइक एका इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग करण्यात आल्या होत्या.

समोर आलेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक बाइकमधील एका बॅटरीने अचानक पेट घेतला. ज्यानंतर एका पाठोपाठ सुमारे ८ बाइकने पेट घेतला होता . आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी आग विजवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीचं स्वरुप भयंकर असल्याने ही आग विझवता आली नाही. त्यामुळे या आगीत तब्बल ८ वाहनांचं सुमारे अंदाजे साडेसहा लाखांचं नुकसान झालं आहे.

अक्षय पार्क इथल्या प्राईम रोज या ६ मजली इमारतीत प्रदीप जाधव हे कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या मालकीचं शाहूपुरी तिसर्‍या गल्लीत गाड्यांचं शोरूम आहे. बॅटरीवरील वाहनांची एजन्सी असल्याने या वाहनांची विक्री ते करतात. या दुचाकींपैकी एका वाहनातील बॅटरीने अचानक पेट घेतला. एकापाठोपाठ एक अशी १० वाहनं पार्क केली असल्याने बॅटरीचा स्फोट झाल्याने इतर वाहनांनीही पेट घेतला.

Team Global News Marathi: