कोल्हापुर जिल्ह्यात निवडणुकापूर्वी इच्छुक उमेदवारांनी एकमेकांना गुलाल लावून आनंद साजरा केला
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अखेर श्री गणेशा झाला निवडणुकीसाठी आज सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली होती या दिवशीच प्रारूप रचनेचा आरखडा प्रसिद्ध केला 23 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत सूचनांसाठी व तक्रासाठी वेळ दिला आहे
कोल्हापूर महानगरपालिकेच्या केशवराव भोसले नाट्य सभागृहात सकळी 11 वाजता सोडत सुरू झाली. सोडतीमुळे मात्र एका वेगळ्याच विषयामुळे चर्चा सुरू झाली यातील अनेक इच्छुक उमेदवार आज सोडत प्रक्रियेवेळी केशवराव नाट्य सभागृहात उपस्तिथ होते. सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांमध्ये ”कुठे आनंद तर कुठे नाराजी”असे पाहायला मिळाले
विशेषतः अपेक्षित आरक्षण जाहीर झाल्याच इच्छुक उमेदवारांच्या मनाला आनंद पारावर उरला नाही. उमेदवारांनी उत्साहाच्या आनंदात गुलालाची उधळण केली व आपला आनंद व्यक्त केला. कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्यातच इतके उत्साहाचे वातावरण असले,तर पुढे निवडणूक रंगात आल्यानंतर हे राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.