भविष्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होणार

भविष्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होणार

नांदेड : अलिकडच्या राजकारणात भाजपकडून जातीयवादी राजकारण केले जात आहे. यामुळे सर्व समाजाने भाजपचे स्वार्थी राजकारण हाणून पाडावे. कॉंग्रेसची विचारसरणी सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे, आगामी काळात राज्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉंग्रेसच्यावतीने व्यर्थ न हो बलिदान- चलो बचाएॅ संविधान या कार्यक्रमानिमित्त मंगळवारी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सत्काराचे आयोजन कुसूम सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रमास राज्याचे प्रभारी एच. के.पाटील, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख, ना. विजय वडेट्टीवार, ना. अस्लम शेख, ना. वर्षा गायकवाड, माजी मंत्री डी.पी.सावंत, कॉंग्रेसचे सचिव संपक कुमार, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे, समन्वयक विनायक देशमुख, अमेय छाजेड, आ. अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीत कोणताच सहभाग नव्हता त्यांनी धर्माच्या नावावर देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र जिथे जातीयवाद झाला त्याचे परिणाम त्या देशास भोगावे लागले आहेत.

देशाचे स्वातंत्र्य कॉंग्रेसच वाचवू शकतो. सर्वानी एकत्रीत येत भाजपचे स्वार्थी जातीयवादी राजकारण हाणून पाडावे असे आवाहन करीत आगामी काळात राज्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एचक़े.पाटील म्हणाले की, कै.शंकरराव चव्हाण यांना अशोकराव चव्हाण यांच्या सारखा चांगला वारसदार मिळाला आहे.एवढेच नव्हे तर जे मतदार त्यांना निवडून देतात तेच आता कै.शंकरराव चव्हाण यांचे वारसदार झाले आहेत.
अशोक चव्हाण यांचे काम म्हणजे सोजीची चाळणी असे आहे. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शंकरराव चव्हाण यांना वारसदार चांगला मिळाला आहे,असे कौतुक केले.तर स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचविण्यात येईल असे नाग़ायकवाड यांनी सांगीतले.

यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणोल की, भारताचा स्वातंत्र्य लढा, त्याचे नायक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचाल, याबाबत मागील ५-६ वर्षांपासून देशवासियांची दिशाभूल केली जाते आहे. चुकीची, व विपर्यास करणारी माहिती पसरवली जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षार्चे औचित्य साधून ख-या इतिहासाला उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉगे्रसचा अजेंडा विकासाचा असून नाना पटोले यांची भुमिका कॉंग्रेसची आहे. राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करित आहे.असे स्पष्ट केले.ना.विजय वडट्टीवार यांच्यासह ना.शेख इतर नेत्यांची भाषणे झाली. सकाळच्या सत्रात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी मराठवाड्याचे भगिरथ कै. शंकरराव चव्हाण यांना सर्व नेत्यांनी अभिवादन केले. यानंतर स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

दुपारच्या सत्रात भक्तीलॉन्स येथे झालेल्या चार जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिका-यांच्या आढावा बैठकीत बोलतांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गेल्या चार महिन्यात कॉंग्रेसने अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे पक्ष संघटन वाढले आहे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना यातून पुढे आणले आहे. कार्यकर्ते, पदाधिका-यांनी संघटन वाढविण्यासाठी युध्दपातळीवर बुथ तयार करावेत, काम न करणा-यांना काढून टाकावे. पक्षात आता काम करणारे पाहिजेत कागद घेवून फिरणारे नकोत असे स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी पाटील यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेस मोठी पार्टी होत आहे असे सांगून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेडचा मोठा विकास केला आहे. ते पाहून आम्हालाही आनंद होत आहे असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात कॉग्रेसचा झेंडा फडकवू: ना. अमित देशमुख
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची या कार्यक्रमाची संकल्पना असून यानिमित्ताने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सर्वांना एकत्रीत केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. चोख नियोजनातून झालेल्या या कॉंग्रेसच्या कार्यक्रमातून मराठवाड्याचे भगिरथ कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेवून नांदेडहून घेतलेली ही उर्जा, शक्तीच्या बळावर महाराष्ट्रात कॉंग्रेसचा तिरंगा फडकवण्यात येईल आणि राज्यात कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.

आ. अमर राजूरकरांची होणार पदोन्नती
कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष यांनी चारही जिल्ह्यातील कॉंग्रेस कमिटी अध्यक्षांचा आढावा घेतल्यानंतर नांदेड कॉंग्रेस कमिटीचा आढावा सर्वप्रथम गोविंदराव नागेलीकर यांनी भाषणात आढावा सांगत ना. चव्हाणांमुळे हे सर्व शक्य असल्याचे बोलून दाखविले. त्यानंतर महानगराध्यक्ष म्हणून आ. राजूरकर यांना निमंत्रीत करण्यात आले त्यावेळी राजूरकरांनी गेल्या अनेक वर्षापासून महानगराध्यक्ष पदाचा पदभार माझ्याकडे आहे. नागेलीकर आमच्या टिमने जिल्ह्यात चांगले काम केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. अनेक आंदोलने आम्ही यशस्वी पारपाडली. आता तुमच्या कारकिर्दीत निवडणूक घेवून पदाधिका-यांची नियुक्ती करावी असे मत मांडले. शेवटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आढावा बैठकीत राजूरकरांची पदोन्नती करायची का असा सवाल करत सभागृहातील सर्व कार्यकर्त्यांना होकार असेल तर हात उंच करुन सांगा असे म्हणताच सभागृहातील सर्वच कार्यकर्त्यांनी दुजोरा दिल्यामुळे आ. अमरनाथ राजूरकर यांची लवकरच पदोन्नती केली जाईल अशी ग्वाही पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिली. त्याच्या ठिकाणी नवीन महानगराध्यक्ष लवकरच निवडल्या जाईल असे ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: