बुलढाण्यात कोविड सेंटरमध्ये स्वॅब न देता रुग्ण निघाला पॉझिटिव्ह

बुलढाणा  : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने स्वॅब टेस्टिंगवर भर दिलेली आहे. मात्र आता बुलढाणा जिल्ह्यातून कोविड सेंटरवर घडलेली एक धक्कादायक माहिती समोर येत आहे त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
बुलडाण्यातील कोविड सेंटरमध्ये मोताळा शहरात असलेले नागरिक पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यांचे नाव नोंदवून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता स्वॅब टेस्ट करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. पण या ठिकाणी ते परत तपासणीसाठी गेलेच नाही.

त्यानंतर कोविड सेंटरमधून त्यांना काल फोनद्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये यावे आणि उपचार घ्यावे. कोरोनाचा स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पंडितराव यांना धक्का बसला. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा कोविड सेंटरवर सुरु असलेला गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्वॅब न देता माझा रिपोर्ट कसा काय पॉझिटिव्ह येऊ शकतो असाच प्रश्न आता पंडितराव देशमुख यांना पडला आहे. सध्या या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

Team Global News Marathi: