“२०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच”

 

२०१४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने भाजपाबरोबर युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून शविसेना नि भाजपा युतीबद्दल विधाने राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे. यातच आता एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना आणि भाजपबाबत एक भविष्यवाणी केली असून, २०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच, असा मोठा दावा केला आहे.

थ्री इन वन आहे की टू इन वन आहे काही कळत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का यांनी? याला धर्मनिरपेक्षता म्हणतात का? शिवसेनेला सत्ता देऊन तुम्ही धर्मनिरपेक्षतेविषयी बोलता का, या शब्दांत ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. ते सोलापुरात बोलत होते. मात्र त्यांच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला आहे.

एमआयएमसोबत गेले तर जातीयवाद मग राहुल गांधींनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे? महाराष्ट्रात काय सुरु आहे? १९९२ ला काय झाले होते हे लोक अजून विसलरलेले नाहीत. असे असताना महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आली. ही महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह आहे. परस्पर विरोधी विचारधारेचे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात. २०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला.

Team Global News Marathi: