इकडं पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्यावर बोलतात, अन तिकडं रुग्ण ऑक्सिजन अभावी प्राण सोडतायंत !

 

    कोल्हापूर: सध्या देशभरात रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांनी आपले प्राण सोडले आहे. त्यातच आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडलेली दिसून येत आहे.  एकीकडे पालकमंत्री सतेज पाटील जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त करताना दुसरीकडे ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाने आपले प्राण सोडले आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केलं. ध्वजारोहण केल्यानंतर सतेज पाटील थेट जिल्हाधिकारी कक्षात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मनपा अधिकारी तसेहच जिल्हयातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोरोना संदर्भात चर्चा  होत असताना ही घटना घडलेली आहे.

पालकमंत्री सतेज पाटील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत असतानाच एका कोरोना रुग्णानं ऑक्सिजनअभावी प्राण सोडले. सर्जेराव पांडुरंग कुरणे असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय ४१ वर्षे होतं. रंकाळा टॉवर परिसरातील स्टेट बँकेच्या शेजारी असलेल्या महालक्ष्मी रुग्णालयात सर्जेराव यांच्यावर उपचार सुरू होते. २६ एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

Team Global News Marathi: