“जन आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर जशाच तसे उत्तर मिळेल”

 

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि त्यानंतर मिळालेला जामीन या घटनाक्रमामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेत दोन दिवस खंड पडला. मात्र, नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरु झालेली जन-आशीर्वाद यात्रा शुक्रवारपासून पुन्हा त्याच उत्साहाने सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर आता शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला आहे.

जठार पुढे म्हणाले की, नारायण राणे यांच्या अटकेसाठी आलेले पोलीस दरवाजा तोडण्याची धमकी देत होते. मोगलाई सुरु आहे. म्हणून मी यांची तुलना औरंगजेबाशी केली. संभाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. राजन साळवी यांना इतिहासाचं ज्ञान नाही. पॅसिफिक महासागरातील बेटावरुन त्यांनी डॉक्टरेट ही पदवी आणली आहे. कुणीतरी त्यांना भडकवलं आहे. असं करा नाहीतर पुढच्यावेळी तुम्हाला तिकीट नाही. आणि त्याची लस इकडे लागवी म्हणून वैभव नाईकांना सांगितलं तुम्ही नाही बोललं तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. हे दोघेही दु:खी आत्मे आहेत. अशा शब्दात प्रमोद जठार यांनी टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले की, अनिल परब यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या दोन कटप्पांनी बाहुबलीचा गेम केला. संजय राऊत आणि फडणवीस यांच्याकडे बघितलं तर नक्की गांजा कोण प्यायला आहे, हे लक्षात येतं. मराठा समाजाच्या आंदोलनावेळी मुका मोर्चा लिहिणाऱ्या संजय राऊत यांनी त्यावेळी गांजाची की अफूची गोळी घेतली होती? असा खोचक सवालही प्रमोद जठार यांनी विचारला आहे.

Team Global News Marathi: