भाजलेले चणे खाण्याचे हे जबरदस्त फायदे माहित नसतील आवर्जून वाचा दररोज चणे खाणे सुरू करा…

मुंबई: तुम्ही भाजलेले चणे(roasted chana) खाल्लेच असतील तर जर आतापर्यंत केवळ टेस्टसाठी भाजलेले चणे खाल्ले असतील तर ते आता रोज खाणे सुरू करा. चण्यामध्ये भरपूर व्हिटामिन्स(vitamins) असतात जे आपल्या आरोग्यासाठी(health) गरजेचे असतात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि चांगले व्हिटामिन्स असतात. भाजलेले चणे आरोग्यासाठी खूपच पौष्टिक मानले जातात. तसेच इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेने स्वस्तही आहेत.

ब्लड शुगर नियंत्रित राहते

चणे खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर नियत्रिंत राहण्यास मदत करतात. डॉक्टर्सही शुगर असलेल्या पेशेट्सना चणे खाण्याचा सल्ला देतात. याच्या दररोजच्या सेवनाने शुगरचा त्रास दूर होतो. भाजलेल्या चणे दररोजच्या डाएटमध्ये सामील केल्यास डायबिटीजपासून आराम मिळतो.

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहेत चणे

प्रेग्नंट महिलांना चणे खाल्ल्याने खूप फायदे मिळतात. गर्भारपणात स्त्रियांना उलट्यांचा त्रास होतो. याचा परिणाम बाळावरही होतो. कारण उलट्यांमुळे शरीरावर जोर पडतो. यावेळी महिलांना भाजलेल्या चण्याचे सत्व फायदेशीर ठरते.

हाडे मजबूत होतात

चण्यामध्ये दूध आणि दह्यामध्ये जितके कॅल्शियम असते तितके आढळते. दररोज चणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

स्नॅक्स म्हणून खाण्यास उत्तम

संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही चणे खाल्ले पाहिजे. यामुळे डाएट कंप्लीट होते. हे खाण्यासही चांगलेलागतात. चणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. तसेच यात कॅलरीज कमी असल्याने वजनही कंट्रोलमध्ये राहते

रोगप्रतिकारक क्षमता वाढेल

चणे खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होईल. यामुळे साहजिकच रोगप्रतिकारक क्षमताही वाढेल. चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स असल्याने आपली हेल्थ सिस्टीम मजबूत करकाक

वजन होते कमी

भाजलेल्या चण्यांचा दररोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

कबंरदुखीपासून सुटका

अशक्तपणामुळे अनेकदा महिलांना कंबरदुखीचा त्रास होतो. अशात महिलांनी दररोज दोन मूठ चणे खाल्ल्यास फायदा होतो. कंबरदुखीपासून सुटका मिळते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: