नेमणुका करता येत नसतील तर एमपीएससीच्या परीक्षा घेता कशाला? खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा संताप |

 

मुंबई | राज्यात आज ५ आणि उद्या ६ जुलैला विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पाडणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली होती.

या सर्वांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा होईल. त्यामुळे विधानसभेत आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी नियुक्त्या या व इतर मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना खडाजंगी उडत आहे. दरम्यान, सरकारने या अधिवेशनात काही घोषणा केली नाही तर मूक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे भाजप खा. संभाजी राजे छत्रपती म्हणाले आहेत.

संभाजीराजे म्हणाले की, विदर्भातील मराठा कुणबी झाले, दोन्ही एकत्र आहेत. कुणबी समाजाला आरक्षण मिळतेय, पण मराठ्यांना नाही. स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली, तो असेल मराठा समाजाचा. त्याची निवड झाली. पण त्याला मुलाखतीला बोलावलं नाही. मग एमपीएससीच्या परीक्षा घेता कशाला? नेमणूक करता येत नसेल तर यात सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे. या अधिवेशनात काही घोषणा केली नाही, तर मूक आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

Team Global News Marathi: