आपण बदललो नाही, तर आयुष्य तरी कसं बदलेल!

बदल , आव्हाने आणि मानसिक आरोग्य

मेराज बागवान
बारामती, पुणे

आयुष्यात बदल हा नित्याचाच आहे आणि बहुतेकवेळा हा बदल गरजेचा देखील असतो.परंतु प्रत्येक जण ह्या बदलला वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जातो. आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, संकटे, दुःखे, आव्हाने , ताण-तणाव हे आता कायमचेच झाले आहेत.

पूर्वीच्या काळात आणि आता जमीन-आस्मानाचे बदल झाले आहेत.त्यामुळे आता , एक आव्हान संपले की सगळी संकटे सम्पली असे म्हणणे निरर्थक आहे.एक आव्हान संपले की दुसरे , हा प्रवास कायम चालूच राहणार.मग या परिस्थिती अति ताण घेण्यापेक्षा आपण ह्या बदलाला सामोरे कसे जातो, हे महत्वाचे ठरते.

जेव्हा आयुष्यात वेगवेगळे बदल होतात, आणि त्यामुळे रोजच नवनवीन आव्हाने जन्म घेतात.मग अशा वेळी काय करायचे? आपले मानसिक आरोग्य कसे जपायचे? तर आपण काही ह्या गोष्टी करून पाहुयात का?

१) जेव्हा आयुष्यात मोठा बदल होतो, त्यावेळी तो आपल्या चांगल्यासाठी, किंबहुना आपल्या सर्वांगीण विकासासाठी झाला आहे, असा विचार करावा.यामुळे मन शांत होईल आणि सारासार विचारसरणी वाढीस लागेल.

२) आयुष्यात जी आव्हाने आली आहेत, त्याचा अभ्यास करावा. ही आव्हाने आपल्याला काय शिकवित आहेत आणि आपण त्यातून काय शिकत आहोत, हे पाहावे.म्हणजे , हळूहळू हीच आव्हाने पार करून यश कसे मिळवायचे हे समजेल.

३) जीवनात , मनात अति ताण का निर्माण होतो? तर ते आपल्या विचारांमुळेच.अर्थात ताण हा गरजेचा च असतो , पण अति ताण पण जीवघेणा ठरतो. यामुळे मग आपले विचार नेहमी सकारात्मक असले पाहिजेत.’मी हे करू शकते/शकतो’,ह्यातून मी मार्ग काढणे फार कठीण नाही’ अशी विचारसरणी जर का ठेवली तर ताण आपण नियंत्रित करू शकतो.ताणाला आपण नियंत्रित करायला शिकले पाहिजे, ना की ताणाने आपल्यावर कुरघोडी केली पाहिजे.

४) आयुष्यातील बदल स्वीकारताना, ‘माझा स्वतःवर विश्वास आहे’, ‘संपूर्ण दुनिया आपली स्वप्ने साकार करण्यासाठी हातभार लावीत आहे’,’विधाता कायम अपल्यासोबत आहे’ असा विश्वास कायम मनात ठेवला तर काहीच अशक्य नाही.आणि यामुळे मग मानसिक आरोग्य देखील योग्यरीत्या जपले जाईल.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ह्या दुनियेत आलो आहोत तर , बदल, समस्या, संकटे की प्रवासातील आपले सहाप्रवासी च आहेत.जो पर्यंत आपण ह्या दुनियेत आहोत, तो पर्यंत ही सगळी मंडळी नेहमीच आपल्या सोबत राहणार, असणार.

त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये कुठल्या गोष्टींमुळे फरक पडत असेल तर तो म्हणजे, ‘आपला दृष्टिकोन, आपली विचारसरणी’. आणि स्वतःची, स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही आपलीच,स्वतःचीच जबाबदारी आहे, नाही का?

सो , फ्रेंड्स ‘ऑल द बेस्ट अँड एन्जॉय’!

साभार आपलं मानसशास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: