वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

 

मुंबई | खूप दिवसांनी समोरासमोर, राज्यभर शिवसंपर्क मोहिम सुरु झाली आणि कोरोना वाढला. त्यानंतर मानेचे दुखणे शस्त्रक्रिया. एक व्हायरस लाट आणू शकतो तर शिवसेनेच्या तेजाची लाट आपण आणायची. दिल्लीत सुध्दा बाळासाहेबांचा पुतळा बसवायचा. दर वर्षी २३ जानेवारी रोजी लोकांची गर्दी. प्रमोद नवलकरांना उध्दवसाहेब ठाकरेंचे अभिवादन.

दोन महिने उपचारात गेले, लवकरात लवरकर महाराष्ट्र पिंजून काढणार, काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार विरोधकांची काळजी नाही. आपणच त्यांना पोसलं २५ वर्षे युतीत सडली यावर ठाम, शिवसेनाप्रमुख म्हणायचे राजकारण हे गजकरण. भाजपचे सत्तेसाठी हिंदुत्वाचे कातडे पांघरले. आम्ही हिंदुत्व नाही सोडले सोडणार नाही भाजपला सोडले भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.

अमित शहा म्हणाले एकट्याने लढा आमची एकट्याने लढण्याची तयारी. आव्हान देऊन ईडी वगैरे ससेमिरा लावायचा. पुढे जात असतांना भाजप वागले. तेव्हा यांचे डिपाॅझिट जप्त व्हायचे. समता ममता सगळ्यांना समवेत भाजपने युती केली. अटलजींना शिवसेनेचे सहकार्य. सोयीप्रमणे कश्मिरात, संघमुक्त भारत म्हणा नितिश कुमार सोबत युती. मतांसाठी गोवंश बंदी दूर केली. मर्दासारखी उघडपणे शिवतीर्थावर काँग्रेस सोबत युती, सरकार पाडून आमदार फोडून तुम्ही सरकार स्थापन केले. असले हिंदुत्व आमचे नाही.

इतर राज्यात सुध्दा शिवसेना निवडणुका लढवते. हरलो तरी पराजयाने खचून जायचे नाही विजयाचा उन्माद नको. कधी तरी जिंकणारच. नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांक वर असलो तरी आम्ही जागा किती लढवल्या अगदी युती मध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या. आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हवे. इतर वेळा मी पण या निवडणुकीत फिरलो नाही हे टाळायला हवे. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी.लढाई निर्णयाक निष्ठेने असते. सहकारात आपण काय करतो आहे? गावात संस्था निर्माण कराव्यात नियमबाह्य नाही. सत्तेचा दूरगामी उपयोग व्हावा. संधीचे सोने करा.

लढ्यात आपण एकमेव पक्ष. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा. बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले नवहिंदू सगळे भंपक नव्या पिढीला हे माहिती व्हावे म्हणून पुनरूच्चार. आपण महाराष्ट्रात राहिलो तेव्हा कदाचित आपण दिल्लीत आलो असतो. मोदींच्या, शहांच्या अर्ज भरण्यास गेलो. मनापासून तुमचा प्रचार केला. आज एनडीए राहिली नाही जुने ते सर्व गेले. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला नाही. बलवान हिंदुत्व हवय. आज आपण गप्प बसलो तर गुलामगिरी येईल. आणीबाणी सदृश परिस्थिती मोडायची असेल तर शिवसैनिकांनी समोर यायला हवे.

यापुढे प्रत्येक निवडणूक बँक, स्वराज्य संस्था लोकसभा सर्व निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या. आशाताईंच्या पुण्यात शिवसेनेने घेतलेल्या कार्यक्रमाची आठवण. निवडणुकीत निष्काळजीपणा नको. फाजील आत्मविश्वास नको. साहेबांच्या जन्मदिनी सांगेल तुम्ही महाराजांना मानता अस समजा आज महाराज रायगडावर आहे ते आपल्याला पाठीवर थाप देतील. आजही साहेब आपल्यातच आहे, आपण अस काय केले तर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील असा रोज विचार करा. शिवसैनिक समर्थ बलवान आहे.

Team Global News Marathi: