कार्यकर्ता असावा तर असा भक्त हनुमाना सारखा; वाचा सविस्तर-

आजकाल नेते आणि कार्यकर्ते ही निष्ठावंत राहिले नाहीत असं आपण म्हणतो.मात्र आजही कितीतरी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. की जे नेत्यासाठी काहीपण करायला असतात.असाच प्रत्यय बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आढळून आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराई चे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांने आपल्या छातीवर पंडित यांचा फोटो गोंदवून घेतला आहे. या प्रेमामुळे पंडित निशब्द झाले असून कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्यात घालून असे करू नये असे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्ट मध्ये स्वतः पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की,
हा ज्ञानेश्वर वैद्य माझे मुळ गाव दैठण येथील रहिवासी. आज याने आपल्या छातीवर माझा फोटो गोंदविला याची माहिती झाल्यानंतर मी निःशब्द झालो.

या आधी देखील विधानसभेला माझा विजय व्हावा यासाठी ज्ञानेश्वरने नवरात्रीचे नऊ दिवस गढी येथील तुळजा भवानी मंदिरात उभे राहून उपवास करत नवस केला होता.

मला विधानसभेला निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. जनतेची सेवा करत असतांना कुठं तरी आपण कमी पडलो याची जाणीव मनात सतत होत असते. परंतु या तालुक्याने मागील २० वर्षांपासून मला जे प्रेम दिल आहे त्याची कुठेच तुलना होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर सारख्या तरुणांच प्रेम मला ऊर्जा देतं यांनी याच ऊर्जेने मला काम करण्याची ताकद येते.

कालही मी आपल्या सेवेत होतो आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. परंतु या माध्यमातून मी माझ्या युवक मित्रांना विनंती करतो की अश्या प्रकारे अंगावर कोणीही असे काही गोंदवू नये. याने इजा होण्याची शक्यता असते. आपलं प्रेम सदैव माझ्या सोबत आहे… या प्रेमातून उतराई शक्य नाही…!!

ग्लोबल न्युज नेटवर्क: