मुंबई : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर नोटीस बजावली आहे. नीलम राणे (Neelam Rane) आर्टलाइन प्रॉपर्टीज या कंपनीने डीएचएफएलकडून घेतलेले कर्ज न फेडल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार हे लुकआउट सर्क्युलर काढण्यात आले आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आता आमची तर ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार असा इशारा दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, “हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाते मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापुर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुळे अशा नोटिसीला उपयोग नाही. त्यामुळे याप्रकरणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचची अडचण होणार महाविकास आघाडीची अडचण होणार”
ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार
हे सर्क्यूलर कुणी काढलं असेल यावर बोलतांना नितेश राणे म्हणाले, सर्क्यूलर कुणी काढलं हे या ठाकरे सरकारला विचारा. यांची झोप आम्ही उडवत आहोत. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार आहेत. त्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेल. तसेच लुकआउट नोटिस संदर्भात आम्ही हायकोर्टात बोलू या गोष्टींशी आमचा सबंध नाही.
याद रखना.. pic.twitter.com/wNO0eQ8VzC
— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2021
ठाकरे सरकार महाराष्ट्र बुडवायला निघालं
“तसेत सर्क्यूलर त्यांनी आम्हाला नाही तर विमानतळ प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे आम्हाला प्रवास करता येणार की नाही हे त्यांना ठरवावं लागणार आहे. आम्ही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. ठाकरे सरकार महाराष्ट्र बुडवायला निघालं आहे. वर्षानुवर्षे कर भरुन, अधिकृत व्यवसाय करुन आम्ही राजकारण करतो. यांच्यासारखे काळे धंदे आम्ही करत नाही.” असे म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.