सरकार करत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा अमृता फडणवीसांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा !

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विविध मुद्द्यावरून सरकारवर टिका करणाऱ्या मिसेस अमृता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. लशीची कमतरता आहे, १५ ते २० दिवसात लस उपब्लध होतील. तसेच मी स्वत: लवकरच व्हॅक्सीन घेणार आहे. कलाकारांकडे आपण लक्ष द्यायला हवं. सर्व गोष्टी करायला पाहिजे, सरकार करत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावं, त्यांना प्रवासांचे पासेस मिळायला हवेत, प्रत्येक व्यक्तींना लस घ्यायला हवी, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी आज धारावीमध्ये रेशन किटचं वाटप केलं. यावेळी त्या बोलत होत्या. धारावी जनतेनं शक्तिशालीरीत्या कोरोनाशी झुंज दिली. धारावीतील लोकांनी एकत्रित येऊन नियमांचं पालनं केलं, त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचंही अमृता फडणवीस यांनी अधोरेखित केलं आहे.

ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यामुळे ज्याला शक्य आहे, त्यांनी मदत करणं गरजेचं आहे. कलाकाराला खूप स्वाभिमान असतो, अशा दिवसात कलाकार आणि मुख्यतः बॅक स्टेज कलाकारांना याचा फटका बसलाय. आमच्या फाऊंडेशनच्या मार्फत कलाकारांना शक्य ती मदत करीत आहोत. छोट्या कलाकारांचे पेमेंट अडकले आहेत. मोठ्या कलाकारांना पेमेंट मिळतो. मात्र छोट्या कलाकारांना मदत मिळाली पाहिजे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Team Global News Marathi: