राजन साळवींना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी भाजपात यावे

राजन साळवींना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी भाजपात यावे त्यांना निवडून आणण्याचे काम माझे – नितेश राणे

जैतापूर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांपैकी तब्बल ९० टक्के जणांनी मोबदला स्वीकारला असल्यामुळे या ऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केले. तसेच नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर आघाडी पुढाकार घेईल असे वक्तव्य केले होते.

मात्र त्यांच्या या वक्त्यव्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजन साळवी यांच्या या वक्तव्यावर नाराज असल्याची बातमी समोर येत होती. तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी साळवी यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे बोलून दाखविले होते.

याच संधीचा फायदा घेत आमदार नितेश राणे यांनी राजन साळवी यांना खुली ऑफरच दिली आहे. साळवी यांना शिवसे नेत त्रास होत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपात यावं. नाणार समर्थक आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे. आता राजन साळवी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे,

ग्लोबल न्युज नेटवर्क: