शिवसेनेचं खच्चीकरण अन् अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जात असेल तर… – उदय सामंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ भाजपाचे खासदार नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मराठा नेतृत्व, येऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणुक लक्षात घेता भाजपा त्यांना संधी देईल, अशी शक्यता आहे वर्तविण्यात येत आहे. त्यातच आता खासदार नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांवर आता शिवसेनेनही प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही. शिवसेना ज्यांच्या नेतृत्वात काम करते असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्त्व अख्ख्या जगाला दिसलेलं आहे. कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे, असं उदय सामंत यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत पुढे म्हणाले की, देशातील सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेना मंत्रीपद दिल जात असेल तर हा चुकीचा समज आहे, असा टोला देखील उदय सामंत यांनी नारायण राणे आणि भाजपाला लगावला आहे.

Team Global News Marathi: