हिंदू अल्पसंख्याक झाले तर कायदा दफन होईल, गुजरातच्या मंत्र्यांचे मोठे विधान

 

पुणे एकदा भाजपा मंत्र्यांne वादग्रस्त विधान करून आपल्या नागावर नाव वाद ओढावून घेतला आहे. देशात जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायद्याचे राज्य चालेल. मात्र हिंदू अल्पसंख्याक झाले तर कायदाच ‘दफन’ होईल, असा दावा गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज केला.

नितीन पटेल स्पष्ट शब्दांत पुढे म्हणाले की, ‘माझे वक्तव्य लिहून ठेवा, वाटलंच तर माझे विधान व्हिडीओ करून ठेवा. देशात हिंदू बहुसंख्य असेपर्यंतच संविधान, धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी केल्या जातील. ज्या दिवशी देशात हिंदूंची संख्या कमी होत जाईल त्याच दिवसापासून धर्मनिरपेक्षता, लोकसभा, संविधान आणि कायदा हे काहीच शिल्लक राहणार नाही. हे सगळे हवेत उडून जाईल. पटेल याच्या या विधानानंतर राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.

या वक्तव्यानंतर पटेल यांनी असेही स्पष्ट केले आहे की, ‘मी प्रत्येक मुसलमानाबाबत अशी गोष्ट करीत नाहीय. मुसलमानही मोठय़ा संख्येने देशभक्त आहेत. लाखो इसाई देशभक्त आहेत. गुजरात पोलिसांत अनेक मुस्लिम आहेत. ते सगळे देशभक्तच आहेत! लग्न करून जोरजबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने ‘धर्मांतरण विरोधक कायदा’ – गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन अधिनियम-2021′ आणला, मात्र याविरोधात काही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या. यानंतर काही कलमांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबत गुजरात सरकार लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.

Team Global News Marathi: