IAS झालो तेव्हा राहायला घर नव्हतं, आज शेकडो कुटुंबाना घराचं पत्र देतोय याचा आनंद (व्हिडिओ)

बार्शी – सनदी अधिकारी आणि कोडरमा(झारखंड) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बार्शीपुत्र रमेश घोलप यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घराचे स्वीकृतीपत्र देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेकडो कुटुंबाना हक्काचं घर देण्यात आलं. त्यावेळी घोलप यांनी आत्यानंद होत असल्याच म्हटलं. घर मिळाल्याचा आनंद मी शब्दात वर्णन करु शकत नसल्याच ते म्हणाले.याच वेळी जेव्हा मी IAS झाले तेव्हा मला ही घर नव्हतं हे सांगायला ही ते लाजले नाहीत.

रमेश_घोलप यांनी उपस्थित लाभार्थीनां मार्गदर्शन करताना आपला भूतकाळ सांगितला. आज ज्यांना या योजनेतून घर मिळाले, त्याचा आंनद मी अगदी जवळून समजू शकतो. कारण, 2012 मध्ये मी जेव्हा IAS परीक्षा पास झालो. त्यावेळी मलाही राहायला घर नव्हते. नातेवाईकांना मिळालेल्या इंदिरा आवास योजनेतील एक खोलीत माझं कुटुंब राहत होतं.

त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार मी कोडरमा जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना अतिशय प्रभावी आणि पारदर्शी राबविन्यासाठी प्रयत्नशील असल्याच घोलप यांनी म्हटलं. घोलप यांच्या भाषणावेळी व्यासपिठावरील मान्यवरही भावुक झाले होते. तर, आपल्याला घर देणारा ‘साहब’ ही आपल्यातलाच एक असल्याचा आनंद लाभार्थींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: