मी रात्रभर चॅनल बदलत बघत असतो, पुन्हा अजित पवारांनी उडवली चंदकांत पाटलांची खिल्ली

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाने सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षावर जोरदार टीका करण्यास सुरवात केली होती. त्यात भाजपाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार जोरदार प्रहार केला होता. त्यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांच्या टीकेला अजित पवारांनी जोरदार प्रतिउत्तर देत त्यांची खिल्ली उडवली आहे.

मी रात्री झोपेत असताना वारंवार उठून बघतो सरकार पडले की काय? रात्रभर आलटून-पालटून हा चॅनल लाव… तो चॅनल बघ… असं सगळं माझं चालू असतं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. जोपर्यंत आमचे तीन पक्ष आणि त्यांचे नेते एकत्र आहेत तोपर्यंत कोणीही माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, असे बजावले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही या नारायण राणे यांच्या टीकेचा अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘राणे हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत का प्रयत्न केले नाही? एकीकडे पवारसाहेब समोर असताना त्यांच्यापुढे वाकायचे आणि माध्यमांसमोर आल्यावर टीका करायची. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, ही साधी गोष्टदेखील त्यांना माहीत नाही का, अशी विचारणा केली

Team Global News Marathi: