आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, कधी भेटली नाही रिया चक्रवर्ती यांच्या वकिलाने केला खुलासा….!
सिनेअभिनेता सुशांत सिह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची गलफ्रेण्ड रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप भिहार पोलीस आणि सुशांतच्या जवळच्या नातेवाइकांकडून लागवण्यात आले होते. मात्र विरोधकांनी या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव जोडून त्यांना सुद्धा बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु केला होता.
यात आता रियाच्या वकिलांनी रियाचं नवे स्टेटमेन्ट जारी करताना तिच्या वकिलांनी स्पष्ट केले की रिया विरोधात पोलीस आणि ईडीच्या चौकशीत काहीही मिळाले नाही. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबियांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणतंही तथ्य नसून मनाला येईल तसे आरोप ते करत आहेत.
पुढे बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीबद्दल होत असलेल्या चर्चांबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, दोघे कधीही भेटले नाही. रियाला शिवसेनेच्या नेत्यांबद्दल फक्त ऐकून माहिती होते. पण ती आदित्य ठाकरे यांना कधीही भेटली नाही. अनेक राजकीय नेते याचा गैरफायदा उचलू पाहत आहेत. असा आरोप त्यांनी लावला आहे.