“मी कुणालाही घाबरत नाही, फोन टॅपिंगमुळे मला काही फरक पडत नाही”

 

नवी दिल्ली | देशात फोन टॅपिंग प्रकरण सध्या चांगलेच गाजू लागले असून काँग्रेस नेते आणिखासदार राहुल गांधी त्यांचे फो सुद्धा टॅप होत असल्याची माहिती समोर आली होती. यावर आता खुद्ध राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. गुप्तचर विभागाच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपला फोन टॅप होत असल्याचे सांगितले आहे. फोनवर काय बोलू नये हे आपल्याला मित्रांमार्फत सांगितले जाते.

मात्र, मी कुणालाही घाबरत नाही आणि याचा मला काहीही फरक पडत नाही, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला उघड आव्हान दिले. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालय तसेच राफेल गैरव्यवहाराची चौकशी रोखण्यासाठी पेगॅससचा वापर करण्यात आल्याचाही दावा राहुल गांधींनी केला.
ते म्हणाले, आपला फोन टॅप करण्यात आला.

हा आपल्या खासगीपणाचा विषय नव्हे. विरोधी पक्षनेता या नात्याने आपण जनतेचे प्रश्न मांडतो. पंतप्रधान मोदींनी पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर आपल्या देशाविरुद्ध केला आहे. यासाठी पंतप्रधान आणि गृह मंत्री यांच्याशिवाय दुसरा कोणीही परवानगी देऊ शकत नाही. इस्राईल सरकारने सर्वप्रथम पेगॅससचा एक शस्त्र म्हणून वापर केला. आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकशाही विरोधात त्याचा वापर करत आहेत. हे आक्रमण जनतेच्या आवाजावर आहे.

Team Global News Marathi: