नवरा-बायकोचं भांडण लेकरान जीव गमावला, एका वर्षाच्या चिमुकलीला वडिलांनी जीवंत पुरलं

 

नवरा बायकोच्या भांडणांचा बऱ्याचदा शेवट अगदी निर्दयीहोताना दिसून आला आहे बऱ्याचदा या भांडणात संतापजनक आणि धक्कादायक शेवट होतो हे आजपर्यंत आपण ऐकली आहेत. अशीच एक संतापजनक घटना वाशिममध्ये समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

सुरेश घुगे असे सत्तावीस वर्षीय निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत वाडी वाकद शेतशिवारातील गोठ्यावर राहतो. आरोपीला तीन मुली आहेत.

सुरेश हा नेहमी पत्नी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची. सुरेशला दारूचे व्यसन जडले. काल दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे धावत गेली. तिने आपल्या दीराला हकिकत सांगितली.

Team Global News Marathi: