शुभाशुभ… 18 नंतर चांगला दिवस.
आज विशेष… साधारण दिवस
राहूकाळ… दुपारी 03.00 ते 04.30.
दिशा शूल….उत्तरेस असेल.
नक्षत्र… कृतिका 17.54 पर्यंत नंतर रोहिणी.
आजची चंद्र राशी… वृषभ.
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – भगवा)
आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने तुमचे मानसिक स्वास्थ्य ही उत्तम असेल. गृहिणी पाहुण्यांची ऊठबस हसतमुखाने करतील. उत्साही दिवस.
वृषभ – (शुभ रंग – डाळिंबी)
दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.
पती पत्नीचं नातं कस असावं ; वाचा सविस्तर-
मिथुन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीला प्राधान्य देणे आवश्यक राहील.
कर्क – (शुभ रंग – पांढरा)
नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल विवाहविषयक बोलणी होकारार्थी पार पडतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. सदिच्छा ठेवा.
दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठविणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये – आठवलें
सिंह – (शुभ रंग – मोरपंखी)
अथक प्रयत्नांच्या जोरावर तुमची आज ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. नेतेमंडळींचा जनमानसावर प्रभाव राहील व्यवसायात भिडस्तपणा बाळगून चालणार नाही.
कन्या – (शुभ रंग – राखाडी)
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या. शासकीय कामात वशिला लावण्याची गरज भासेल.
देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र
तूळ – (शुभ रंग – निळा)
अनपेक्षित काही मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. जोडीदाराच्या हो ला हो करूनच वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी ठेवता येईल.
वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)
रिकामटेकड्या चर्चेतुन वाद होण्याची शक्यता आहे समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक अजिबात करू नका. डोके शांत ठेवून घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
जाणून घ्या महाराष्ट्रातील घराघरात केलं जाणारं पिठलं…अनं त्याची खासियत
धनु – (शुभ रंग – गुलाबी)
आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारी ही दुर्लक्षित करू नका. कोणतेही निर्णय उतावीळपणे घेणे योग्य ठरणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.
मकर – (शुभ रंग – सोनेरी)
आज बरेच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. गृहणी पार्लर साठी वेळ काढतील. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.
देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र
कुंभ – (शुभ रंग – निळा)
आज तुम्हाला एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारी वर्गाने अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. खेळाडूंनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
मीन – (शुभ रंग – जांभळा)
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. गृहिणींना आज वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल. शेजाऱ्यांशी झालेले गैरसमज दूर होतील.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)