आजचे पंचांग – वार शनिवार, दि. 19.01.2022
शुभाशुभ विचार- सामान्य दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा
चंद्र राशी – कर्क.
_______________________
आजचे राशी भविष्य-
मेष- (शुभ रंग- मोतिया)
आज सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. समोरील व्यक्ती तुमच्या प्रभावात राहिल. काही गुडन्यूज येतील. गृहिणींचे संसारीक कष्ट कारणी लागतील. सासुबाई कडून कौतुक होईल.
वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)
ज्येष्ठ मंडळी देव दर्शनाचे बेत आखतील. नोकरदारांचे कार्यालयीन कामानिमित्त प्रवास होतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवावेत. यश वाटते तितके सोपे नाही.
मिथुन – (शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेले कष्ट कारणी लागतील. तुमची सामाजिक पत ही वाढणार आहे. आज आर्थिक बाजू भक्कम असेल. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाला मान राहील.
कर्क – (शुभ रंग- क्रीम)
आज मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. विरोधक चुका काढण्याचा प्रयत्न करतील.
सिंह- ( शुभ रंग- हिरवा)
आज काही दूरचे नातलग आपल्या संपर्कात येतील. काही जणांना अचानक दूरचा प्रवास घडेल. जमाखर्चाचा ताळमेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. अनावश्यक खर्चाला लगाम घाला.
कन्या- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
उद्योगधंद्यातील काही येणी आज आकस्मिकपणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. तरुण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. दिवसाच्या उत्तरार्धात लाभ संभवतो.
तुळ – ( शुभ रंग -आकाशी)
आज नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. सरकारी नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. उच्च शिक्षित तरुणांच्या महत्वाकांक्षा वाढतील. ज्येष्ठांना पाठीची दुखणी सतावतील.
वृश्चिक – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नोकरीधंद्याच्या दृष्टीने काहीसा विरोधी दिवस. कोणतीही गोष्ट सहज साध्य झाली नाही तरी तुमचा प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. देवही आज नवसाला पावेल. आजी आजोबा नातवंडात रामतील.
धनु – ( शुभ रंग- निळा).
कार्यक्षेत्रात हितशत्रू टपून बसले असल्याने कामातील चुका परवडणार नाहीत. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षेची भाजी घ्यावी. गैरवर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकते सतर्क राहा.
मकर – ( शुभ रंग – चंदेरी)
आज कार्य क्षेत्रात तुम्ही स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना आपण होऊन मदत कराल. इतरांच्या भांडणात ही मध्यस्थी करावी लागेल.
कुंभ –( शुभ रंग -गुलाबी)
दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होऊ शकते. नोकरदारांना कामाचा थकवा जाणवेल. जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात. अन्यथा आजार बळावेल.
मीन – ( शुभ रंग- भगवा)
उच्चशिक्षित मंडळींना मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, काही अपुर्या स्वप्नांची पूर्तता होईल. प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)