लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्ताव आणणाऱ्या खासदार रवी किशनला किती मुलं ?

 

उत्तरप्रदेश |  उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरण आणल्यानंतर आता केंद्रातही त्यादृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात खासगी सदस्य विधेयक मांडलं आहे. यावर ६ ऑगस्टला चर्चा अपेक्षित आहे.

सध्या खासदार रवी किशन सध्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गावी आले आहेत. खासगी सदस्य विधेयक २३ जुलै संसदेच्या पटलावर सादर करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला सुरू होईल. ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल. यामध्ये १९ दिवस कामकाज चालेल अशी माहिती समोर येत आहे.

मात्र दुसरीकडे खा. रवी किशन लोकसंख्या नियंत्रणाबद्दल विधेयक मांडणार असल्याची माहिती पुढे येताच सोशल मीडियावर त्यांच्याच कुटुंबाची चर्चा रंगली. लोकसंख्या नियंत्रणाचा आग्रह धरणाऱ्या रवी किशन यांनाच ४ मुलं आहेत, याकडे अनेकांनी लक्ष वेधलं. काहींनी रवी किशन यांचा कुटुंबासोबतचा फोटो ट्विट केला, तर काहींनी या परिस्थितीला दिव्याखाली अंधार म्हणत खिल्ली उडवली आहे.

 

Team Global News Marathi: