आजचे पंचांग – वार मंगळवारी, दि. 22.02.2022
शुभाशुभ विचार — 16 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती 15.36 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- निळा )
कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धि होईल. आज पत्नीने दिलेले सल्ले फारच उपयुक्त ठरणार आहेत. महत्त्वाच्या वाटाघाटी यशस्वी होतील.
वृषभ – (शुभ रंग – मोरपिशी )
रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी, अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.
मिथुन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
घरात आधुनिक सुख सुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.
कर्क- ( शुभ रंग – चंदेरी )
सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आज गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांचे हट्ट स्वखुशीने पुरवाल.
सिंह- ( शुभ रंग- जांभळा )
तुमच्या एखाद्या नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामातही काही अडथळे संभवतात. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील.
कन्या- (शुभ रंग- पांढरा )
आज रिकामटेकड्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवणे हिताचे. प्रवासात खूपच दगदग होईल.
तूळ- ( शुभ रंग- भगवा )
आज वादविवादात तटस्थ राहा. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.
वृश्चिक- ( शुभरंग- पिस्ता )
आज टेलिफोन व लाईट बिले भरावे लागतील. काही अत्यावश्यक देणीही चुकवावी लागतील. हौस मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. काहीजण दूरच्या प्रवासाचा आनंद घेतील.
धनु- ( शुभ रंग – आकाशी )
वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. संततीकडून सुवार्ता येतील. जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीतून चांगला लाभ पदरी पडेल.
मकर- ( शुभ रंग- राखाडी )
कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. नेतेमंडळी अधिकारांचा योग्य वापर करतील.
कुंभ – (शुभ रंग- तांबडा )
नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच केलेली बरी. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा असेल व देवही आज नवसास पावेल. अधिकारी वर्गाने अधिकारां पेक्षा कर्तव्याचा विचार केलेला बरा.
मीन – ( शुभ रंग – केशरी )
नव्यानेच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करू नका. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. वाहन चालवताना इतर काही विचार करू नका.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)