राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
आजचे पंचांग – वार बुधवार, दि. 12.01.2022
शुभाशुभ विचार – 14 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – भरणी 14.00 पर्यंत नंतर कृत्तिका.
चंद्र राशी – मेष 20.46 पर्यंत. नंतर वृषभ.
—————————————
आजचे राशिभविष्य
मेष (शुभ रंग – राखाडी)
आज तुमच्या मनाची चंचल अवस्था राहील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याचा मोह होईल. पण तसे न करणे हिताचे राहील. बरेच दिवसांनी काही दूरचे नातलग संपर्कात येतील.
वृषभ (शुभ रंग- मरून)
घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील. व्यवसायात काही अत्यावश्यक देणी द्यावी लागतील. पैशाअभावी काही महत्त्वाची कामे रखडतील. खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील.
मिथुन ( शुभ रंग – सोनेरी)
आज कार्यक्षेत्रात वाढत्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. बेकायदेशीर कृत्य अंगाशी येऊ शकतात. आज मित्रांच्या फार नादी लागू नका, नवीन उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.
कर्क- (शुभ रंग – चंदेरी)
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमी असेल. काही कामे आज निस्वार्थीपणे करावी लागणार आहेत. दानधर्म करताना आपली मिळकत ही विचारात घेणे गरजेचे.
सिंह (शुभ रंग – गुलाबी)
कसलेही नवे उपक्रम सुरू करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. आज कष्टांचा हि अतिरेक टाळा. सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा, विश्रांतीही गरजेची आहे.
कन्या – ( शुभ रंग – आकाशी)
धंद्यात आवक-जावक सारखीच राहील. नवे परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील वैवाहिक जीवनात वाद टाळण्यासाठी जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.
तूळ -(शुभ रंग- सोनेरी)
अधिकारी वर्गाला हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितली तर वसूल होण्याची शक्यता आहे. आज खेळाडूंचा स्पर्धेतील विजय नक्की
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
मित्रांमध्ये केवळ मोठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च आज आपण कराल. मुलांच्या बाबतीत आज काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत.
धनु – (शुभ रंग भगवा)
प्रॉपर्टी विषयी काही कामे रखडलेली असतील तर अशा कामांना चालना मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. गृहिणींना मुलांच्या अभ्यासात डोकवावे लागणार आहे.
मकर- ( शुभ रंग- पिस्ता)
अधिकारी वर्गाने कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. कोर्ट प्रकरणे कोर्टाबाहेर निपटून टाकणे हिताचे राहील. विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून बाकी सर्व काही सुचेल.
कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्हाला विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. ज्योतिषी असाल तर तुम्ही केलेली भाकीते खरी ठरतील. आशादायी दिवस.
मीन- ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)
आज भावना व कर्तव्य यात तुमच्या मनाची ओढाताण होईल. काही साधे निर्णय घ्यायला ही तुम्हाला बराच वेळ लागेल. पत्नी म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे व्हा.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी आणि वस्तू सल्लागार)