राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

– आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 September 2022

वार – बुधवार

तारीख 14.09.2022

शुभाशुभ विचार – चांगला दिवस

आज विशेष – भरणी श्राद्ध

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30

दिशा शूल- उत्तरेस असेल

आजचे नक्षत्र – अश्विनी 6.57 पर्यंत नंतर भरणी

आजची चांद्रारशी – मेष

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)

आज कुठेही स्वतःचेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील.बारीक सारीक गोष्टींवरून राग अनावर होईल. महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे पुढे दमटवाल.इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

वृषभ – (शुभ रंग- मोतिया)

बेरोजगारांना रोजगारासाठी घरापासून लांब संधी उपलब्ध होतील.अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवासास निघावे लागेल.दुकानदारांनी उधारी उसनवारी आज टाळावी.

 

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)

अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली माणसे जवळ येतील.काही भाग्यवान मंडळींना आज नवीन घराचा ताबा मिळू शकेल.नवविवाहितांची अपुरी स्वप्न साकार होतील.

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील.नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवा.

 

सिंह – (शुभ रंग – मोरपंखी)

नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाही.वरिष्ठ आपल्यावर खूशच आहेत अशा भ्रमात अजिबात राहू नका.मनशांतीसाठी सत्संगाशिवाय दुसरा पर्याय नाही.

कन्या – (शुभ रंग – निळा)

आज जरा आपल्या मर्यादित राहिलेले बरे.धाडसाची कामे अजिबात करू नका.सासुरवाडीकडून एखादा लाभ संभवतो.वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मतांने घ्या.

 

तुळ – (शुभ रंग – आकाशी)

भागीदारीच्या व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा.वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती आज मनाला आनंद देतील.दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

वृश्चिक – (शुभ रंग – भगवा)

ध्येय प्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे.आज तुम्हाला विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत उत्तम यश मिळेल.

 

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.विद्यार्थी आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.छान दिवस.

मकर – (शुभ रंग – राखाडी)

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस कुठेही न जाता मस्त घरी आराम करावा असे वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावर घेतील.मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे.

 

कुंभ – (शुभ रंग – पांढरा)

स्थावर विषयक मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा.आज प्रवासात काही नवीन नाती जुळून येतील. आज काही अति हुशार मंडळीही तुमच्या संपर्कात येणार आहेत, डोके शांत ठेवायला हवे.वाद टाळा.

मीन – (शुभ रंग – गुलाबी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल.सकारात्मकतेने कामाला लागाल.आज मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल.आज नेत्यांची वक्तव्ये जनमानसांवर प्रभाव टाकतील.आशादायी दिवस.

शुभम भवतु

जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: