राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 11 September 2022

रविवार.

तारीख 11-09-22

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – द्वितीया श्राद्ध.

राहू काळ – सायंकाळी 4 ते 6

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा 8.02 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.

आजची चांद्रारशी – मीन.

आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- राखाडी

आज तुम्ही आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळायला हवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उभावेल. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.

वृषभ – शुभ रंग- पिस्ता

नोकरीच्या ठिकाणी आज खेळीमेळीचे वातावरण असेल. सहकारी वर्ग तुमच्या मताचा आदरच करेल अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड चुकणार नाही.

मिथुन – शुभ रंग- गुलाबी

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पिताश्री आज योग्यच सल्ले देतील.

कर्क – शुभ रंग- पांढरा

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. झटपट लाभाचा ही मोह टाळायला हवा. स्वतःवर संयम असू द्या.

सिंह -शुभ रंग- क्रीम

आज दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकलले तर बरे. भागीदारीच्या व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद संभवतात. ज्येष्ठांनी पावले सत्संगाकडे वळवावीत.

कन्या – शुभ रंग- मोरपंखी

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

तूळ – शुभरंग- मरून

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील आज तुमची तब्येत जरा नरमच असेल जुनी दुखणी अंगावर काढू नका पती पत्नीमध्ये असलेले मतभेद दुपारनंतर निवळतील.

वृश्चिक- शुभ रंग-मोतिया

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैव साथ देईल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सोडवाल. हितशत्रू तुमच्या चुका शोधत आहेत सतर्क रहा.

धनु- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील प्रेम प्रकरणां पासून दूरच राहिलेले बरे.

मकर- शुभरंग- भगवा

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरेल. घराबाहेर वावरताना राग काबुत ठेवा.

कुंभ- शुभरंग- हिरवा

आज तुमचे मनोबल उत्तम असेल कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील .

मीन- शुभरंग- सोनेरी

व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील अनपेक्षित पणे येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणारी कामे तुम्ही सहज करून दाखवाल.

 

 

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: