राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 6 September 2022

वार – मंगळवार

तारीख 6.9.2022

शुभाशुभ विचार – 17 पर्यंत चांगला दिवस

आज विशेष – परिवर्तिनी एकादशी

राहू काळ – दुपारी 3 ते 4.30

दिशा शूल- उत्तरेस असेल

आजचे नक्षत्र – 18.09 पर्यंत पूर्वाशाढा नंतर उत्तराशाढा

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – हिरवा)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल.आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार आहे.महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साध साधणे गरजेचे आहे.

वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत.ऑफिसमधील तंग असलेले वातावरण दुपारनंतर निवळेल.आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

मिथुन – (शुभ रंग – राखाडी)

आज केवळ भिडस्‍तपणापायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.आज फक्त आपल्या जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.आज तुम्हाला थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील फार काळजी करू नका.परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.आज वैवाहिक जीवनातले मतभेद संध्याकाळी निवळतील.

सिंह – (शुभ रंग – निळा)

दुकानदारांची थकीत उधारी वसूल होईल.आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

कन्या – (शुभ रंग – डाळिंबी)

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील.गृहिणी आज घर सजावटीवर भर देतील.कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

तुळ – (शुभ रंग- आकाशी)

वास्तु व वाहन खरेदीचे व्यवहार आज टाळले तर बरं होईल.गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी अभ्यासांपेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक – (शुभ रंग – मरून)

आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल.एखाद्या कामासाठी शेजारी धावून येतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेली नाती आज जवळ येतील.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही आपल्याच मर्जीप्रमाणे वागाल.थोडी अहंकाराची बाधा होईल.कठोर बोलण्याने काही आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे. कुणाला आज मोफत सल्ले वाटप करू नका.

मकर – (शुभ रंग – पिस्ता)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडू शकतात.घरात वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल.एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर शोधल्यास सापडेल.

कुंभ – (शुभ रंग – मोरपंखी)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल.तुमची आर्थिक बाजू आज भक्कम असल्याने थोडी अनावश्यक खरेदी ही कराल.लांबच्या प्रवासात बेसावध राहू नका.

मीन – (शुभ रंग – भगवा)

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल.अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊ शकता.हाती असलेला पैसा जपूनच वापरा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका.

शुभम भवतु :

श्री जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: