वार – गुरुवार. 20.07.2023, जाणून घ्या आजचे राशिभविष्य, शुभाशुभ विचार- वृद्धी दिन. आज विशेष- पुष्य रवी. राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00 दिशा शूल – दक्षिणेस असेल. आजचे नक्षत्र -आश्लेषा 10.55 पर्यंत नंतर मघा. चंद्र राशी – कर्क 10.55 पर्यंत नंतर सिंह.
—————–
मेष – ( शुभ रंग- सोनेरी )
व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. मातोश्रींचे सल्ले महत्वपूर्ण असतील.
वृषभ (शुभ रंग- राखाडी )
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज शेजारधर्म जपावा लागेल.
मिथुन ( शुभ रंग- पांढरा )
धंद्यातील येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवायला हवेत.
कर्क (शुभ रंग- पिस्ता.)
तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचाही म्हणणं ऐकून घ्या. समोरची व्यक्ती कदाचित आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा.
सिंह (शुभ रंग- हिरवा )
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. एखादी चीज वस्तू प्रवासात गहाळ होऊ शकते सतर्क रहा.
कन्या ( शुभ रंग- मरून)
कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.
तूळ ( शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल अधिकार योग चालून येतील वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. कर्तव्यास प्राधान्य द्या.
वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा संयम ठेवा.
धनु- (शुभ रंग- मोरपंखी)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. नव्या उपक्रमाची सुरुवात उद्यावर ढकला. ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.
मकर ( शुभ रंग- भगवा )
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.
कुंभ (शुभ रंग – आकाशी)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील जुनी दुखणे अंगावर काढू नका पती-पत्नी मधील काही मतभेद सामंजस्याने मिटतील.
मीन – (शुभ रंग – क्रीम )
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.
शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*