आजचे पंचांग –
वार – शनिवार.
01.07.2023.
शुभाशुभ विचार- 15 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- शनिप्रदोष.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – अनुराधा 15.04 पर्यंत नंतर ज्येष्ठा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- लाल )
आज आपल्या मर्यादित राहिलेले बरे. धाडसाची कामे आज टाळायला हवीत. सासुरवाडीकडून एखादा लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.
मिथुन ( शुभ रंग- गुलाबी)
ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून, तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.
कर्क (शुभ रंग- पांढरा)
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.
सिंह (शुभ रंग- मरून )
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या शिस्तीस आज प्राधान्य द्यायला हवे.
कन्या ( शुभ रंग- हिरवा)
स्थावर विषयक मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आज प्रवासात काही नवीन नाती जुळतील. आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येतील. डोके शांत ठेवावे.
तूळ ( शुभ रंग- भगवा)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.
वृश्चिक (शुभ रंग- मोतिया)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. काही किरकोळ गोष्टींवरून तुम्हाला राग येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे पुढे दामटवाल.
धनु- (शुभ रंग- पांढरा)
बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास करावा लागेल. आज दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.
मकर ( शुभ रंग- सोनेरी)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. अपुरी स्वप्न साकार होतील.
कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवा.
मीन -(शुभ रंग – चंदेरी )
नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी तारेवरची कसरत होईल. ज्येष्ठांना मनशांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.
शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424