Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 16, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

 

ग्लोबल न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

16.06.2023

शुभाशुभ विचार- त्रयोदशी वर्ज्य.

आज विशेष- शिवरात्री.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – कृत्तिका 15.07 पर्यंत नंतर रोहिणी.

चंद्र राशी – वृषभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कामातील उरकही चांगला राहील. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही मित्रमंडळीत मोठेपणा जपण्यासाठी खर्चही कराल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम )

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. इतरांचे ऐकून घेण्याची तुमची मानसिकता नसेल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल.

मिथुन ( शुभ रंग- तांबडा )

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना नाकी नऊ येतील. पासपोर्ट, विजा संबंधित कामे विना व्यत्यय पार पडतील. इम्पोर्ट एक्स्पोर्टचे व्यवसाय चांगले चालतील.

कर्क (शुभ रंग- भगवा)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असल्याने तुमचे विचारही सकारात्मक ठेवा. जसे चिंताल तसे होईल. मोठा भाऊ आज तुम्हाला योग्य सल्ले देईल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )

कार्यक्षेत्रात आज काही पेच प्रसंग यशस्वीपणे सोडवाल. घरी वडीलधाऱ्यांनी दिलेले सल्ले सकारात्मकतेने घ्या. व्यावसायिक मोठे निर्णयही अनुभवींच्या सल्ल्याने घ्या.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. कोणत्याही कामात अति आक्रमकता टाळावी. तरुणांनी कुसंगती पासून लांबच राहावे. ज्येष्ठांनी सत्संगात रमणे हिताचे राहील.

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने विरोधी दिवस. नोकरदारांचा कामाचा डोंगर वाढत जाईल. मोफत सल्लागार मंडळी मागितलेले नसताना सल्ले देतील. आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. गृहिणींना थोडा थकवा जाणवेल. काही आर्थिक येणे असतील तर मागितल्यावर वसूल होतील.

धनु- (शुभ रंग- जांभळा)

ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागेल. नोकरदारांना कामाचे तास वाढवावे लागतील. व्यावसायिकांची येणी वसूल होऊ शकतील.

मकर ( शुभ रंग- तांबडा )

काही हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. रसिक मंडळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. प्रेमप्रकरणे फुलतील. आज तुम्हाला आरोग्य उत्तम साथ देईल.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

आज पैसा कितीही आला तरी तो तुम्हाला कमीच पडेल. मुलांचे लाड जरा आवरते घ्या. त्यांच्या शिस्तीस प्राधान्य द्यायला हवे. आज आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.

मीन -(शुभ रंग – मरून )

आज काही मोफत सल्लागार मंडळी भेटतील. न मागता सल्ले देतील. ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण उत्तम. आज शेजारी मात्र आपलेपणाने डोकावून बघतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क- 9689165424

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group