Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 11, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

 

ग्लोबल न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 11 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

11.06.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेसअसेल.

आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 08.46 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.

चंद्र राशी –  08.46  पर्यंत कुंभ नंतर मीन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

आज परदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. घरात थोरामोठ्यांशी काही वैचारिक मतभेद संभवतात. आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. खर्चावर नियंत्रण गरजेचे.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुम्ही जे जे चिंताल ते ते होईल कदाचित तुमच्या पात्रतेपेक्षा जास्तच काहीतरी पदरात पडेल. आज फक्त शुभ बोल आणि शुभ चिंता.

मिथुन ( शुभ रंग- मरून )

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल कदाचित तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पतकरावी लागेल.

कर्क (शुभ रंग- केशरी.)

आज तुमच्या अथक परिश्रमांना दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल. तुम्हाला सज्जनांचा सहवास लाभेल घरात एखादी धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी )

आज कोणतीही धाडसाची कामे करू नका स्वतःला जपा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्याकडून होईल.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य असली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की मिळेल. काही येणे असतील तर अनपेक्षित रित्या वसूल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. गूढशास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येऊ शकते.

धनु- (शुभ रंग- भगवा)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्याही अभ्यासात डोकवावेच लागणार आहे.

मकर ( शुभ रंग- पांढरा )

आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चाल ढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा ठेवू नये.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

खिशात आज पैसा खेळता असल्याने तुम्ही आनंदी उत्साही असाल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा. गृहिणींना काही प्रिय पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

मीन -(शुभ रंग – पिस्ता )

आज स्वतःचेच खरे करण्याचा अट्टाहास करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी असू द्या. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. गोडबोल्या मंडळींपासून मात्र आज सावध रहा.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य- जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group