आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 December 2022
वार – बुधवार.
07.12.2022.
शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.
आज विशेष- श्री दत्तात्रेय जयंती.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र -कृतिका 10.25 पर्यंत नंतर रोहिणी
चंद्र राशी – वृषभ.
—————————————-
मेष (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.
वृषभ (शुभ रंग- तांबडा) – Today’s Horoscope 07 December 2022
कार्यक्षेत्रात हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. इतरांच्या भानगडीत आज तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल.
मिथुन (शुभ रंग- मरून)
खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या. खोट्या स्तुतीस बाळू जाऊ नका.
कर्क (शुभ रंग- पिस्ता)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कार्यक्षेत्रातील तुमचे कष्ट कारणी लागतील व यशाची चाहूल लागेल. आज दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.
सिंह (शुभ रंग- पांढरा)
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची तुमची आज तयारी असेल.
कन्या (शुभ रंग- भगवा)
उद्योग धंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही अकस्मिक अडचणींचा सामना आज तुम्ही यशस्वीपणे कराल.
तूळ (शुभ रंग- लाल)
आज फक्त आपल्याच स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आज दिवस योग्य नाही. गाडी हळू चालवा
वृश्चिक (शुभ रंग – सोनेरी)
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे उल्लंघन करू नका. सतर्क रहा.
धनु (शुभ रंग – मोरपंखी)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक असणे गरजेचे आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींची ही वेळीच दखल घ्या.
मकर (शुभ रंग – मरून)
आज हौस मौज करण्याकडे तुमचा कल असेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय असतील तर तेजीत चालतील कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.
कुंभ (शुभ रंग – पांढरा)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागू शकतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.
मीन (शुभ रंग – जांभळा)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर वाद संभवतात.
.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424