राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग –
वार – शनिवार.
12 November 2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस
आज विशेष- संकष्ट चतुर्थी. ( चंद्रोदय 20.59)
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – मृग 7.33 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- मरून )
आज तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. घर दुरुस्तीच्या काही कामात लक्ष घालावे लागणार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. लहान भावास आज तुमच्या मदतीची गरज भासेल.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. अति स्पष्ट बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक आवक जरी चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करू नका.

कर्क (शुभ रंग- जांभळा.)
पैसा येण्याआधीच पैसा जाण्याचे मार्ग तयार असतील. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा घरात पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज संध्याकाळी पुन्हा शोधल्यास सापडेल.

सिंह (शुभ रंग- गुलाबी )
आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र आज तुम्हाला दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून टाका.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)
उच्चशिक्षित तरुणांना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील छान दिवस आहे.

तूळ ( शुभ रंग- गुलाबी)
ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल चालूच राहील. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपिशी)
कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध घडलेल्या काही घटना तुम्हाला बेचैन करतील. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. आज तुम्हाला सासुरवाडीकडून लाभ संभवतो.

धनु- (शुभ रंग- निळा)
आज तुम्ही आपल्या मर्यादित रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना काळजी घ्या. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे, पालक तुम्हाला हिताचेच सल्ले देतील.

मकर ( शुभ रंग- जांभळा )
कार्यक्षेत्रात आज काही पेच प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद असतील. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

कुंभ (शुभ रंग – लाल)
महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून या रुग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल.

मीन -(शुभ रंग – लेमन )
आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन अडकू नका. हाती असलेला पैसा जपून वापरा मुलांचे ही अति लाड थांबवा.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: