राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 4 November 2022
वार – शुक्रवार.
04.11.2022
शुभाशुभ विचार- 7 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- प्रबोधिनी एकादशी.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल -पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- आकाशी )
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज मनासारखा खर्च करू शकाल. आज मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. परंतु अति उत्साहात तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जातील. मित्रही आज चुकीचा रस्ता दाखवतील. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान देणे हिताचे राहील

 

मिथुन ( शुभ रंग- निळा )
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. प्रयत्नांस दैव अनुकूल राहील.

कर्क (शुभ रंग- मोरपंखी.)
कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची उगीच घाई करू नका. झटपट लाभाचा मोह आज टाळावा लागेल.

 

सिंह (शुभ रंग- मोतिया )
केवळ भिडस्तपणा पायी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा.

कन्या ( शुभ रंग- राखाडी) Today’s Horoscope 4 November 2022
आज काही आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोके वर काढतील. फार काळजी करू नका परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी थोडे नमतेच घ्या.

 

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. कलाकार संधीचे सोने करतील नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)
गृहिणी आज घराच्या सजावटीसाठी पैसा खर्च करतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमीयुगोलांनी तर आजच्या दिवस मौनव्रत ठेवणे हिताचे राहील.

 

धनु- (शुभ रंग- केशरी)
वास्तु व वाहन खरेदीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रामतील. वाहन रस्त्यात नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.

मकर (शुभ रंग- पांढरा)Today’s Horoscope 4 November 2022
एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे करू शकाल. दुरावलेले मित्र आज जवळ येतील.

 

कुंभ (शुभ रंग – लाल)
आपल्या कार्यक्षेत्रात इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जिद्द बाळगाल. विरोधकांनाही तुमची मते पटवून द्याल. ज्येष्ठांनी आज प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.

मीन -(शुभ रंग – निळा )
घरात थोरांशी काही वैचारिक मतभेद संभवतात. त्यांच्या वयाचा मान राखावा लागेल. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल जो टाळता येणार नाही. आज वाद टाळून सुसंवाद साधा.
शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

ग्लोबल न्युज नेटवर्क: