राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 3 November 2022
वार – गुरूवार.
०३.११.२०२२.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००.
दिशा शूल -दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – शततारका.
चंद्र राशी – कुंभ.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- पिस्ता )
व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास किंमत राहील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा. आज म्हणाल ती पूर्व.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )
आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांना दोन हात दूरच ठेवलेले बरे.

मिथुन ( शुभ रंग- मोतिया )
आजचा दिवस उद्योग धंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल असल्याने महत्त्वाची कामे उद्यावरच ढकला. नोकरदरांना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड होऊन बसेल.

 

कर्क (शुभ रंग- राखाडी.)
आज कोणत्याही प्रकारचे धाडस नको. झटपट लाभाचा मोह तर अजिबात नको. विवाह विषयक बोलणी उद्यावर ढकला. जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

सिंह (शुभ रंग- निळा )
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावाखाली राहील पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.

 

कन्या ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहभातीपूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)
तरुण वर्गाचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती धडधाकट असेल.

 

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरदारांना आज ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. गृहिणींना थोडा थकवा जाणवेल.

धनु- (शुभ रंग- मरून)
ऑफिस कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडतील. साहित्यिक मंडळी दर्जेदार लिखाण करतील. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील गृहिणींना शेजार धर्म पाळावा लागेल.

 

मकर ( शुभ रंग- भगवा )
कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव राहील. व्यवसायात आज आवक मनासारखी असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी आत्मविश्वासाने स्वीकाराल.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)
आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्च कराल. फारच सडेतोड बोलून कुणाच्या भावना दुखावू नका.

 

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
काहींना तातडीचे दुरचे प्रवास घडतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: