राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 2 November 2022
वार – बुधवार.
०२.११.२०२२.
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस
आज विशेष- कुष्मांड नवमी.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर १४.१६ पर्यंत नंतर कुंभ.
—————————————-


मेष – (शुभ रंग- लाल)
प्रतिष्ठित मंडळींच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे थोडेसे अवघड जाईल. व्यस्त दिवस.

वृषभ (शुभ रंग- निळा)
आज घरात वडीलधाऱ्या मंडळीशी काही मतभेद संभवतात. तुम्हाला आज थोडी एकांताची गरज भासणार आहे ज्येष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे वळतील.

 

मिथुन (शुभ रंग- हिरवा)
आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही नोकरीच्या ठिकाणी आज नियमांशी अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. हीतशत्रू टपूनच बसलेले आहेत सतर्क रहा.

कर्क (शुभ रंग- निळा)
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असेल. काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. दिवसाचा पूर्वार्ध जास्त अनुकूल.

 

सिंह (शुभ रंग- पिस्ता)
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच असतील आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे धंद्यातील थकलेली येणी वसूल होतील.

कन्या (शुभ रंग- मोरपंखी)
नोकरदारांना नोकरीत बदल बदल करायची इच्छा असल्यास त्यांना उत्तम संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या प्रयत्नांना यश येईल. रुग्णांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा दिसून येईल.

 

तूळ (शुभ रंग- चंदेरी)Today’s Horoscope 2 November 2022
जमीन खरेदी विक्री संबंधीचे काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अवघड विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज धावपळीचा दिवस असून तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

 

धनु- (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात फार अर्जंट नसतील तर टाळायला हवेत.

मकर (शुभ रंग- राखाडी)
कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरात पडू शकते. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील.

 

कुंभ (शुभ रंग – केशरी)
आज तुमचा मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. वाणीत गोडवा ठेवाल तर बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

मीन -(शुभ रंग – आकाशी)
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

 

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: