राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग (Today’s Horoscope 20 October 2022)
गुरूवार.
तारीख 20.10.2022
शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल- दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- आश्लेषा 10.30 पर्यंत नंतर मघा.
आजची चांद्रारशी – कर्क 10.30 पर्यंत नंतर सिंह.
————————————–


मेष – शुभ रंग- सोनेरी
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. रुग्णांना असाध्य आजारावर योग्य उपाय सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आज आनंदित व्हाल.

वृषभ – शुभ रंग- मोतिया
आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेला पैसा आज जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. मुलांचे अति लाड थांबवा.

 

मिथुन – शुभ रंग – पिस्ता
नोकरीच्या ठिकाणी आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांस अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल.

कर्क- शुभ रंग- क्रीम – (Today’s Horoscope 20 October 2022)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासू शकते.

 

सिंह -शुभ रंग- जांभळा
आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल. अति स्पष्ट बोलण्याने तुमचीच काही माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करू नका.

कन्या-शुभ रंग- चंदेरी
विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज संध्याकाळी परत शोधली तर सापडेल.

 

तूळ- शुभ रंग- गुलाबी
जिवलग मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मोठे आर्थिक व्यवहार असतील तर दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या.

वृश्चिक- शुभ रंग- पांढरा
उच्चशिक्षित मंडळींना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र आज उशीर लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेले शब्द पाळतील. उत्तम दिवस.

 

धनु- शुभ रंग- राखाडी
अधिकारी वर्गास आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतिच्या जोरावर आज ध्येयाकडे तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका

मकर- शुभ रंग- डाळिंबी
कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला थोडे नैराश्य येईल आज वरिष्ठांशी नमते घ्या आणि हाताखालच्या मंडळींशी जुळऊन घ्या. मारुतीच्या उपासनेत खंड नको.

 

कुंभ- शुभ रंग- पिस्ता
आज जरा आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी वाईट संगती पासून लांब राहावे. पालक तुम्हाला हिताचेच सल्ले देतील

मीन- शुभ रंग- पिस्ता
आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे तेच प्रसंग निर्माण होतील व ते तुम्ही यशस्वीपणे सोडवा वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद राहणारेच आहेत भागीदारी व्यवहारात मात्र देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा.

 

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: