राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग. (Today’s Horoscope 6 October 2022)

शुक्रवार.

तारीख 07.10.2022

शुभाशुभ विचार- क्षयदिन वर्ज्य.

आज विशेष – प्रदोष.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- शततारका 6.58 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.

चंद्र राशी- कुंभ.

————————————–

मेष – शुभ रंग- मोरपिशी

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराच्या चाव्या मिळतील. तुमची अपुरी स्वप्ने साकार होतील.

वृषभ- शुभ रंग- सोनेरी

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळणे आवश्यक आहे मित्रमंडळींना लांबच ठेवलेले बरे.

मिथुन- शुभ रंग-स्ट्रॉबेरी

नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरिष्ठ आपल्यावर खूश आहेतच अशा भ्रमात मुळीच राहू नका. मनशांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

कर्क- शुभ रंग- जांभळा (Today’s Horoscope 6 October 2022)

आज आपल्या मर्यादित राहिलेले बरे. धाडसाची कामे टाळा. आज तुम्हाला सासुरवाडी करून एखादा लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मतानेच घेणे हिताचे. झटपट लाभाचा मोह नको.

सिंह -शुभ रंग-डाळिंबी

भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही काळ खोळंबा संभवतो. मुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील.

कन्या- शुभ रंग- पिस्ता

ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत निर्विवाद यश मिळेल.

तूळ- शुभ रंग- डाळिंबी

उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.

वृश्चिक- शुभ रंग- आकाशी

आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. कुठेही न जाता घरी आराम करण्याचा तुमचा मूड राहील. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या शिस्तीस प्राधान्य द्याल.

धनु- शुभ रंग-निळा

स्थावराचे मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. प्रवासात काही नवीन नाती जुळतील. आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येऊ शकतात. डोके शांत ठेवायला हवे.

मकर- शुभ रंग- आकाशी

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

कुंभ- शुभरंग- मरून

आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न असेल काही क्षुल्लक गोष्टीवरून तुम्हाला राग अनावर होईल महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे पुढे दमटवाल.

मीन- शुभरंग- लाल

बेरोजगारांना रोजगार घरापासून लांब मिळेल. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. दुकानदारांनी आज उधारी उसनवारी टाळावी. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा.

शुभम भवतु

– जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: