राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 September 2022

वार – शनिवार

तारीख 10-9-2022

शुभाशुभ विचार- चांगला दिवस

आज विशेष – प्रौष्ठपदी पौर्णिमा

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल

आजचे नक्षत्र – शततारका 9.37 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा

आजची चांद्रारशी – कुंभ

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आज तुमच्या कामाची दखल घेतील.प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील.कामाच्या व्यापात काही घरगुती समस्या दुर्लक्षित होणार आहेत.

वृषभ – (शुभ रंग – गुलाबी)

आज दिवसभरात काही मनाविरुद्ध घटना घडतील.त्यामुळे तुम्हाला नैराश्य येईल.वैवाहिक जीवनात काही मतभेद संभवतात. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

मिथुन – (शुभ रंग – मोतिया)

आज तुमचा देवधर्म व दानधर्म करण्याकडे कल राहील.नास्तिक मंडळीही आज देवाला नवस बोलतील.घरात एखादे देवकार्य करण्याचे मनावर घ्याल.तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील.

कर्क – (शुभ रंग – हिरवा)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे.अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.कुटुंबास तुम्ही आज पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

सिंह – (शुभ रंग – क्रीम)

कला क्षेत्रातील मंडळींना कामासाठी भटकंती करावी लागेल.आरोग्याच्या काही तक्रारी आज तुम्हाला त्रस्त करतील.जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे.आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो.

तूळ – (शुभ रंग – निळा)

पारिवारिक सदस्यांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकीनऊ येतील. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून मात्र तुम्ही आनंदित असाल.गृहिणी अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची आनंदाने उठबस करतील.

वृश्चिक – (शुभ रंग – मोरपंखी)

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील.आज तुम्ही गरजूंना मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येतील.गृहिणी स्वच्छतेचे मनावरच घेतील.

धनु – (शुभ रंग – आकाशी)

आवक चांगली असल्याने मनासारखा खर्च करू शकाल.क्षुल्लक कारणावरून आज शेजारी रुसून बसतील.आज जरा स्पष्ट वक्तेपणास आवर घाला कारण त्यामुळे हितसंबंध दुरावतील.

मकर – (शुभ रंग – भगवा)

आज तुम्ही काहीसे हट्टीपणाने वागाल.कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल.घाई गर्दीत काही निर्णय घ्याल व ते चुकतील.हातचे सोडून पळत्या मागे धावण्यापूर्वी विचार करा.

कुंभ – (शुभ रंग – पांढरा)

एखादी हरवलेली वस्तू गवसेल.आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.नवी वस्त्र खरेदी होईल.आज वडीलधाऱ्यांच्या होला हो करा. त्यांच्या वयाचा मान राखा.

मीन – (शुभ रंग – पिस्ता)

महत्त्वाच्या कामासाठी भटकावे लागेल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.कलावंतांचा विदेशात नावलौकिक होईल.गुढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

शुभम भवतु

जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: