आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 August 2022
वार – बुधवार
24.08.2022
शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस
आज विशेष — प्रदोष
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30
दिशा शूल – उत्तरेस असेल
आजचे नक्षत्र – पुनर्वसु 13.39 पर्यंत नंतर पुष्य
चंद्र राशी – कर्क
________________________
आजचे राशी भविष्य
मेष – (शुभ रंग – राखाडी)
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी. कलाकारांना कामासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
वृषभ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. त्यानंतर थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपारनंतर तातडीने प्रवासास निघाल.
मिथुन – (शुभ रंग- तांबडा)
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल.
कर्क – (शुभ रंग – क्रीम)
महत्त्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर करावेत. काही हरवले असल्यास पुन्हा शोधा म्हणजे सापडेल. आज कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल.
सिंह – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्यावेत. परदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होतील.
कन्या – (शुभ रंग – सोनेरी)
कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. क्षुल्लक कारणाने दुखावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.
तुळ – (शुभ रंग – पांढरा)
विरोधकांचा विरोध कमी होईल. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. एखाद्या जिवलग मित्राच्या मदतीस धावून जाल. इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल.
वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)
आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी उद्भवतील. काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.
धनु – (शुभ रंग – गुलाबी)
आज तुम्ही कुणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नसाल. काही क्षुल्लक गोष्टींनी मानसिक स्वास्थ्य बिघडेल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्यात तर बरे होईल.
मकर – (शुभ रंग – लाल)
कुटुंबातील काही आनंदी घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. प्रेम प्रकरणांना घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.
कुंभ – (शुभ रंग – पिस्ता)
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. आज काही गोड बोली माणसे भेटतील परंतु गाफील राहू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश.
मीन – (शुभ रंग – मोरपंखी)
काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. उद्योग-धंद्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांना मात्र नोकरीत बदल करावासा वाटेल. आज मुले आज्ञाधारक पणे वागतील.
!! शुभम भवतु !!
श्री जयंत कुलकर्णी
फोन – ९६८९१६५४२४
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)